स्मरण चित्र
(MEMORY DRAWING)
संबंधित माहिती वाचण्यासाठी खालीलपैकी एका टाइटल वर क्लिक करा
चित्रकलेतील सर्वांत महत्वाचा व आकर्षक विषय म्हणजे स्मरणचित्र होय. चित्र काढून दोन तासाच्या वेळेत चित्र रंगवून पूर्ण करावा लागतो.
आपल्या दैनंदिन जीवनातला, रोजच्या अनुभवातील एखादा प्रसंग चित्रित करावयाचा आसतो. साहजिकच चित्रविषयात मुले रंगून जातात व वेळ किती लागतो याचा भान मुलांना नसतो.यामुळेच बरेचसे मुलांचे चित्र काढणे अपुरे असते.
योग्य दिलेल्या विषयावरील प्रसंग आठवून, आकर्षपणे रेखाटन करुन नवीन रचनचे सुरेख चित्र निर्माण करणे अपेक्षित आहे. काळजीपूर्वक रंगयोजना करणे .
कच्चे रेखाटन, शीघ्र रेखाटन या स्वरूपात सराव करत रहाणे फायदेशीर ठरते.
जे योग्य दिसेल ते ते पाहून रेखाटावयाची सवय लागली पाहिजे. एस.टी. स्टेशन, बाजार, मंडई, धर्मशाळा, सिनेमागृहे, जत्रा, दुकाने, उपहारगृहे, शाळा आणि क्रीडांगणे, रस्ते, घरे, देवळे, घरातल्या खोल्या, घराबाहेरचा परिसर ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही पाहून तुमच्या वहीत, कच्च्या स्वरूपात, जलदपणे काढून ठेवावेत. माणसांच्या विविध हालचाली बसलेली माणसे निजलेली माणसे,कामात गुंतलेली माणसे, धावणारी-गर्दी करणारी, अशा वेगवेगळ्या माणसांची रेखाटने, वेगवेगळ्या हालचाली करणारे प्राणी, घरगुती पाळीव पशू व पक्षी इत्यादी तुमच्या हातून निरीक्षणाने सराव झाला तर स्मरण चित्रात याचा फायदा होतो.
या चित्रातही भौमितिक साधनांचा वापर करू नये. केल्यास त्या चित्राचा विचार केला जात नाही. पेन्सिल व रबराच्या साहाय्याने काही घटक किंवा दोन ते तीन विषय दिले जातात. त्यातून आपणास योग्य तो विषय निवडून त्याचे एक शीघ्र स्केच काढावे. चित्र कागदाला शोभेल एवढे मोठे असावे. रंगकामासाठी जलरंग किंवा क्रेयॉन रंगांचा वापर करावा. इंटरमिजिएटला मुलांकडून घटक व विषयांची सूक्ष्म निरीक्षणं व सुयोग्य रंगकामाची अपेक्षा असते. विषय वास्तवरूपात रेखाटायला हवा. या विषयाला दीड तास वेळ असतो.
या विषयात कल्पना व प्रत्यक्ष प्रसंगातील आपल्याला जाणवणारी स्मृती या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. तुम्ही प्रत्यक्ष चित्र रेखाटताना ‘चित्ररचना’ कशी केली आहे त्याकडे विशेष परीक्षेत पाहिले जाते. विशेषत: चित्ररचनेतील पाश्र्वभूमीला विशेष महत्त्व असते. त्यामुळे तुम्ही रेखाटलेल्या विषयातील आशय स्पष्ट होतो. तुमच्या रेखाटनात आकाराची निवड आणि सुसंगत मोजणी आवश्यक असते. रेखाटनातील चित्रघटकांना कमी-अधिक (लहान-मोठे आकारमानात रेखाटल्यास) महत्त्व दिल्याने चित्रात जिवंतपणा येतो. रेखाटनात एकसंधीपणा असणे जरुरीचे आहे. चित्राचे मांडणीत एकमेकांशी नाते असणे आवश्यक. आपल्या चित्रात कोणाला महत्त्व द्यावयाचे हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असते. पण तसे महत्त्व कशालातरी देणे रचना सौंदर्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
आतापर्यंत आपण रेखाटन-रचना मांडणी याचा विचार केला. आता आपण रंगसंगतीकडे वळूया. चित्रात एखाद्या विशिष्ट रंगाचा उठाव साधला गेला तर ते परिणामकारक ठरते. रंग जितका आल्हाददायक असेल तेवढे चित्र आकर्षक वाटते. रंगाचा तोल साधणेही आवश्यक असते. चित्राची रंग, रचना सर्वत्र फिरणारी असावी. उत्तम रंगसंगती साधण्यासाठी विविध रंगांची रंगमिश्रणे तयार करून पाहण्याचा सराव करा. मुक्तपणे रंगांचा वापर करा. मात्र चित्र आकर्षक झाले पाहिजे. तुमच्या चित्रात हेतुपुरस्सर काही रंग टाकून बघा. त्यामुळे कदाचित तुमची रंगसंगती सुसंवादी झाल्याचे आढळून येईल.
- स्मरणचित्राचे सरावासाठी रोज थोडा वेळ खर्च केलात तर स्मरणचित्र हा विषय अवघड वाटणार नाही.
- मानवाकृतींच्या हालचाली (वाकणे, पळणे, बसणे) काढण्याचे सराव करावे. त्यांच्या पोशाख पद्धतीचा विचार करावे.
- तुमची निरीक्षण शक्ती वाढवून पाश्र्वभूमीसंबंधी विचार करून ठेवावे.
- स्मरणचित्रात मुख्य विषयाकडे लक्ष द्यावे. तो विषय मध्यभागी काढून पूरक इतर घटकांची मांडणी करा.
- चित्रात फार गर्दी करु नये.व चित्राची चौकट रिकामी वाटणार नाही. अशी रचना करणे आवश्यक आहे.
- रंगकामात फार किचकट काम न करता साधेपणा ठेवा. रंगकामात विविधता आणता यावी यासाठी तुमच्या चित्रात बारकावे रेखाटावे. यासाठी उदा. माणसाचे जाकिट, फेटा, कौलारू घरे, झाडांच्या फांद्या यासारख्या घटकांचा वापर करून चित्र अधिक उठावदार करता येईल.
वरील गोष्टींचा अभ्यास करुन परीक्षा दिले तर चांगले ग्रेड मिळवू शकतो. विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करु शकतो.
Mahadev Sharanappa Khalure, Mo. 8796665555