संकल्पचित्र-नक्षीकाम (DESIGN)
संबंधित माहिती वाचण्यासाठी खालीलपैकी एका टाइटल वर क्लिक करा
संकल्प चित्र म्हणजेच डिझाईन होय. या चित्रात सर्वात जास्त अवकाश विभाजन याकडे लक्ष दिले जाते. आकार रेषा चित्रातील लय, तोल, रंगसंगती कशी निवडली आहे ,यावर चित्राचा ग्रेड ठरविला जातो.आपण चित्राचे आकार काढताना त्या आकाराच्या रचनेमध्ये अवकाशाची विभाजन व्यवस्थित केले आहे का? हे पाहिले जाते. आकारांनी व्यापलेले अवकाश याला व्याप्त अवकाश असे म्हणतात. एखादी चित्र सुंदर दिसण्यासाठी व्याप्त अवकाश खूप महत्त्वपूर्ण असते चित्रात कुठेही जास्त गर्दी अपेक्षित नसतो. प्रत्येक आकार एकमेकावर आच्छादित केलेली दाखवले तरच चित्र आकर्षक दिसेल. चित्रातील आकार रेषा लय याकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. यात दिलेली रंगछटा व रंगसंगती चित्राचा तोल साधून रंगकाम केले पाहिजे. आकारानुसार रंग योजनेची निवड झाली पाहिजे.पोत हा चित्रातील महत्त्वाचा घटक समजला जातो. चित्र सौंदर्यपूर्ण व उठाव पूर्ण दिसण्यासाठी फुल व पानांमध्ये विशिष्ट पद्धतीने पोत निर्मिती करणे अपेक्षित आहे. चित्रात निवडक रंगाचा वापर करून रंगसंगती तयार करता आली पाहिजे.तीन पेक्षा जास्त रंग वापरल्यास चित्रात सौंदर्य निर्माण होऊ शकत नाही म्हणून कमीत कमी तीन रंग यात अपेक्षित आहेत. अन्यथा चित्र विषयाला धोका निर्माण होतो. संकल्प चित्रात शीत रंगसंगती, उष्ण रंगसंगती, एक रंगसंगती, मित्र रंगसंगती, पूरक रंगसंगती अशा पद्धतीने रंगसंगतीचा वापर केला जातो. व प्रत्येक तीन रंगांमध्ये गडद व उजळ छटा करून अनेक रंगांचे अनेक छटा बनवले जातात काळा व पांढरा रंगाचा वापर करून जास्तीत जास्त छटा निर्माण करता येतात. चित्राततील सौंदर्य खूप महत्वपूर्ण भूमिका निभावत असतो.त्यासाठी स्वच्छता नीटनेटकेपणा, घेतलेला बाह्य आकार यातच रंगकाम करता आले पाहिजे. वारंवार हात स्वच्छ ठेवणे,आपल्या ड्रॉइंग पेपरवर रंग सांडणार नाही, किंवा डाग लागणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. ड्रॉइंग पेपर व्यवस्थित क्लीप लावून ठेवला पाहिजे. रंगवताना ड्राँईग पेपरवर रंग लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तरच आपला संकल्प चित्र चांगले काढून परीक्षेत चांगल्या पद्धतीचा ग्रेड मिळवता येतो.
दिलेल्या प्रश्नपत्रिकेतील सूचनेनुसार रेखाटन करावयाचे असते.
हे चित्र रेखाटताना भौमितिक साधनांचा वापर करता येतो. मात्र, हा वापर योग्य तिथे, गरजेनुसार करावा. संकल्पचित्रात वेगवेगळ्या आकाराचे, विषयाचे, वस्तूंचे, डिझाइन बनविण्यास सांगितले जाते. त्यात कसा, काय व किती घटकांचा वापर करावा याबाबत विद्यार्थ्यांला पूर्ण स्वातंत्र्य असते. उदा.ट्रे,हातपंखा,टी शर्ट,बेडशीट,हातरुमाल, पिशवी, पतंग, पॉट, पर्स, साडीची किनार किंवा भौमितिक आकारात असे विषय दिले जातात. त्यात अलंकारिक, भौमितिक, नसर्गिक, अमूर्त अशा कोणत्याही वस्तूंचा शोभेलसा आकार बनवता येतो. एक वस्तू रेखाटून दुसरी ट्रेस करूनही त्याचा उपयोग करायला सांगितला जातो. विषयानुसार आपणास ट्रेस पेपरचा वापर करता येतो.वारील माध्यमे वापरुन संकल्प चित्राचे बाह्यरेखाटन करुन घ्यावे.
संकल्प चित्र तयार करताना चांगली आकाराला शोभिवंत सुसंगत रंगाची निवड करावयास हवं असते. तरच चित्र आकर्षक वाटते. ही निवड रंगसंगती वर अवलंबून आहे. आणि या मिश्रणाच्या घटकावरुन अशा रंगसंगतीचे ढोबळ मानाने गट तयार केले आहेत.
रंग छटा : रंग छटा म्हणजे गडद छटा व उजळ छटा असे दोन प्रकार येतात. एखाद्या रंगात पाणी किंवा पांढरा रंग मिसळल्यास त्या रंगाची उजळ छटा तयार करता येते. व एखादया रंगात काळा किंवा त्या रंगाचा विरोधी रंग कमी अधिक प्रमाणात मिसळल्यास त्या रंगाची गडद छटा तयार करता येते.
रंगकांती : रंगाच्या तेजस्वीपणाचे विविध प्रकार म्हणजे रंगकांती कोणत्याही रंगामध्ये करडा रंगाचे कमी अधिक प्रमाणात मिश्रण केले तर रंगकांती मध्ये बदल होतो.
रंग संगतीचे प्रमुख दोन प्रकार
रंग संगतीचे प्रमुख दोन प्रकार पडतात.
अ) एकरंगसंगती–
ब )बहुरंगसंगती–
अ) एकरंगसंगती- यात एका रंगाच्या अनेक छटा असतात. एक रंगसंगतीचा उत्कृष्ट नमुना निसर्गाकडे पाहिल्यानंतर आपणास समजतो. निसर्गामध्ये हिरव्या रंगाच्या विविध छटा पहावयास मिळतात.
ब)बहुरंगसंगती :- यात विविध रंग व त्यांच्या छटा यांचा समावेश होतो.व्यावहारत ही पध्दत जास्त प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे या रंगसंगतीचे जास्त प्रकार पडतात.
- संबंधित(मित्र ) रंगसगती (फ्रेन्डस कलर स्किम)– नारंगी व जांभळा हे दोन्ही रंग बनवताना आपण तांबड्या रंगाचा वापर करतो याचा अर्थ तांबड्या रंगाचा घटक हा या दोन्ही रंगात आहे. म्हणून तांबडा रंग हा जाभळा व नारंगी रंगाचा संबंधित किंवा मित्ररंग आहे. ज्या दोन मिश्ररंगामध्ये ज्या मुळ रंगाचे घटक आहेत ते मिश्ररंग त्या मुळ रंगाचे संबंधित रंग होय.
उदा. तांबडा= नारंगी व हिरवा
पिवळा = नारंगी व हिरवा
निळा = हिरवा व जांभळा
- विरोधी किंवा पुरक रंगसंगती (काँम्पलेमेंटरी/काँन्टरेस्ट कलर स्किम) ज्या मुळ रंगाचे घटक ज्या मिश्ररंगात नसतात तो त्या मुळ रंगाचा विरोधी रंग असतो. हे रंग एकमेकाच्या विरोधी असले तरी सारख्याच शक्तीचे असतात. ते एकमेकांना पुरक असतात. म्हणजे एकमेकांना उठाव आणतात. कारण दोन्ही रंगांचा एकमेकाशी संबंध नसतो. रंगचक्रातील समोरासमोरील रंग एकमेकांचे विरोधी किंवा पुरक रंग असतात.
उदा. तांबडा x हिरवा
पिवळा x जांभळा
निळा x नारंगी
विरोधी रंग संगतीचे उपयोग – निर्गामधील काही उदाहरणे पाहिल्यास आपल्या हे लक्षात येईल की पोपटाचा रंग हिरवा पण चोच तांबडी आहे. तो शोभिवंत दिसतो. जाहिरातीमध्ये जास्त करुन विरोधी रंगांचाच वापर करतात.
- उष्णरंगसंगती(वार्म कलर स्किम) :
ज्या रंगाचा परिणाम उष्ण, प्रखर, तेजस्वी असा वाटतो, त्यांना उष्ण रंग म्हणतात उदा. पिवळा, नारंगी, तांबडा हे उबदार रंग अगर उष्ण रंग आहेत.अग्नी मध्ये या तिन रंगांचे दर्शन आपणास होते. व अग्निमध्ये उष्णता असते.
- शीत रंगसंगती (कुल कलर स्किम)
ज्या रंगाचा परिणाम डोळ्याना आनंददायक, आल्हादकारक, शितल, शांतमय व उत्साही वाटतो त्यांना थंड रंग असे म्हणतात. उदा. निळा, हिरवा, जांभळा यात प्रामुख्याने निळा रंग हा शीत रंग आहे. रात्रीच्या चांदण्यात निळा रंग प्रामुख्याने दिसतो. पाण्याचा रंग निळसर छटायुक्त असतो. त्यामुळे निळारंग हा शीत रंगसंगतीचा प्रमुख रंग ठरतो.
शांतता, समृध्दी अशा प्रसंगचित्रासाठी याचा वापर करतात.
- समतोल रंगसंगती-
वरील कोणत्याही प्रकारात न येणारी परंतू स्वतंत्र अस्तित्व दाखवणारी रंगयोजना. उदा. यात तृतीय व चतुर्थ रंगाचा उपयोग करतात. सर्व प्रकारचे ग्रे (करडे) रंग वापरतात.
- उजळ रंगसंगती (लाईट कलर स्कीम)
जे रंग मूळ स्वरुपात म्हणजे पाणी न मिसळता वापरले तरी ते उजळ वाटतात. किंवा प्रत्येक रंगामध्ये पांढ-यारंगाचे मिश्रण करुन तो रंग वापरतात. त्यांना उजळ रंगसंगती म्हणतात.
- गडद रंगसंगती (डार्क कलर स्किम)
जे रंग मुळ स्वरुपात व पाणी मिसळून वापरले ती गडदच वाटतात किंवा कोणत्याही रंगात काळा रंग किंवा त्या रंगाचा विरोधी रंग मिसळून तो रंग गडद करून वापरतात त्यांना गडद रंगसंगती म्हणतात.
वरील पैकी कोणत्याही एका रंगसंगतीमध्ये आपणास दिलेले संकल्प चित्र रंगविता येतो.हे स्वातंत्र्य कधीकधी दिलेला असतो.किंवा एखादे रंगसंगती मधेच रंगवावे आशीही सूचना असू शकते.
या परीक्षेला जाताना आवश्यक साहित्यसामग्री सोबत असणे साधने आवश्यक आहे.
यात ए-4 साइजच्या ड्रॉईग पेपरपेक्षा किंचित मोठा बोर्ड किंवा कार्डबोर्ड, पेन्सिल एचबी, 2बी, 4बी, 6बी, शार्पनर, सर्व साहित्य असलेला कंपास बॉक्स, १२ इंचाची पट्टी, वॉटर बॅग, पाण्यासाठी वाटी, रंग बनवण्यासाठी पांढरी प्लेट, गोल व चपटे मोठे ब्रश व लहान रबर,लहान सुती कापड किंवा स्पंज, वॉटर कलर्स, पारदर्शक व अपारदर्शक रंग,क्रेआँन कलर इत्यादी सामग्री सोबत असावी.
या परीक्षेत रबराचा उपयोग कमीत कमी करावा. रंग आवश्यक तेवढेच घ्यावेत. ब्रश वेळोवेळी धुवावा,पाणी वेळोवेळी बदलावे. रफ स्केच बुक सोबत ठेवावे. प्रथम लहान स्केच करुन दहा मिनिट सराव करावा. स्केच आत्मविश्वासाने करावे. चित्रे मोठी काढण्याचा प्रयत्न करावा.वा सौंदर्य निर्मिती करावे.
प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालीलपैकी ऑप्शनवर क्लिक करा