वस्तूचित्र (OBJECT DRAWING)
संबंधित माहिती वाचण्यासाठी खालीलपैकी एका टाइटल वर क्लिक करा
तुमच्यासमोर ठेवलेल्या वस्तूंचे हुबेहूब चित्रण काढणे म्हणजेच वस्तू चित्र होय. वस्तूंचे विविध आकार त्यावरील छाया प्रकाश त्यांचे रंग व त्यावर दिसणारा पोत यांचा अभ्यास करणे हा वस्तू चित्राचा मुख्य उद्देश आहे. आज आपण वस्तू चित्रांचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी वस्तू चित्र आणि स्थिर चित्र यामधील फरक समजून घेतला पाहिजे. दोन्ही प्रकारच्या चित्रासाठी समोर वस्तू मांडलेले असतात. परंतु स्थिर चित्रात वस्तू चित्रा प्रमाणे केवळ वस्तूंचा अभ्यास एवढेच उद्दिष्ट नसतो, तर या स्थिर चित्र यामध्ये मागिल पार्श्र्वभूमी,वस्तूंचा खालचा पृष्ठभाग हेही रंगविणे आवश्यक असते.वस्तू चित्र कागदाला शोभेल एवढा साकार करण्यापलीकडे चित्रकाराला कोणतेही स्वातंत्र्य नसते वस्तू जशाच्या तशा त्याच प्रमाणात काढणे अपेक्षित आहे. चित्रात रंग दिसतात तसेच रंगवणे बंधनकारक असते. पण स्थिर चित्रात तसे बंधन नसते.स्थिर चित्र काढताना व रंगवताना त्यांना भरपूर स्वातंत्र्य दिलेले आहेत . हुबेहूब नक्कल हा स्थिर चित्रा चा उद्देश मुळीच नाही समोरच्या वस्तूंचा संच पाहून त्यातून एक नवीन नवनिर्मिती व एक नवा आकृतिबंध निर्माण करावयाचा असतो. वस्तूंचे पाहिल्याबरोबर आपल्या मनात उठलेले भावतरंग मानसिक प्रतिक्रिया साकार करावयाचे असते. वस्तू चित्र आणि स्थिर चित्र यांच्या उद्दिष्टांमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे स्थिर चित्राचे दुसरे महत्त्वाचे भाग म्हणजे येथे वस्तू चित्र प्रमाण हे केवळ वस्तूंचा संच एवढाच अभ्यास करावयाचा नसून तर त्याच्या सापेक्ष अभ्यास यात अभिप्रेत असतो.
वस्तू चित्र समोर मांडणारे वस्तू दोन प्रकारच्या असतात एक मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा दोन्ही वस्तूच्या संच समोर ठेवून वस्तू चित्राची मांडणी करण्यात येते .या मांडणीतून एक उत्कृष्ट संयोजन विविध आकारांचे व रंगाचे एक मनोहर चित्र त्यातून निर्माण झाले पाहिजे, असे अपेक्षित असतो. त्या मांडणीत असलेले सर्व वस्तू त्या वस्तूंच्या रेषा, रूप ,छायाभेद रंग,पोत यांची विशिष्ट संयोजन करुन तोल,लय साधून आपले चित्र कसा आकर्षक दिसेल या पद्धतीने रंग काम करणे अपेक्षित असते.वस्तूंच्या मांडणीत थोडाफार बदल केला तरी मूळ संचाची प्रतिकृती कायम ठेवून चित्र काढणे अपेक्षित असते. एखादी वस्तू कमी केले किंवा रंग बदलले तरी यात सूट देण्यात येते. चित्र पेपरला शोभेल एवढ्या आकारात चित्रात सौंदर्य, मांडणी, रंगकाम या सर्वांचा विचार केला जातो.शासकीय ग्रेड परीक्षेत एलिमेंटरी परीक्षेत पहिलाच पेपर वस्तू चित्र ठेवण्यात आला आहे.यासाठी वेळ तीन तास असतो.
आपल्यासमोर ठेवलेल्या वस्तूंच्या संख्यांचे हुबेहूब रेखाटन करण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. अचूक रेखाटन पद्धती अपेक्षित आहे. पेपरच्या चारी बाजूला एक ते दीड सेंटीमीटर जागा सोडून पेपरच्या मधोमध पेपरला शोभेल असा रेखाटन काढणे आवश्यक आहे .समोरच्या वस्तूंचा संचय पाहून पेपर उभा धरावा का आडवा धरावा याचे स्वातंत्र्य आपणास दिलेले आहेत. वस्तुंचे रेखाटन करत असताना हात न उचलता एकाच स्ट्रोक मध्ये वस्तूचे रेखाटन करणे अपेक्षित असते. परत-परत रेषा गिरवून रेखाटन केल्यास चित्रातील सौंदर्य नाहीसा होण्याची दाट शक्यता असते. म्हणून या चित्राचा नेहमी सराव करणे अपेक्षित असते. रबर न वापरता रेखाटन करण्याची सवय जडल्यास कोणतेही रेखाटन चांगल्या पद्धतीने आपण काढू शकतो. चित्र रेखाटत असताना चित्रातील यथार्थ दर्शन दाखवणे अपेक्षित आहे. समोरील वस्तू मागील वस्तु हे रेखाटन मधुन ओळखता आले पाहिजे.
वस्तू चित्राचे रेखाटन करून झाल्यानंतर लगेच काही वेळात रंग कामाची तयारी करणे अपेक्षित आहे. रंग काम करताना आवश्यक असणारे सर्व साहित्य सोबत असणे गरजेचे आहे ते सर्व साहित्य आपल्या समोर काढून ठेवावे. त्यानंतर आपणास कोणत्या रंगाच्या माध्यमातून वस्तू चित्र रंगवायचं आहे ,तो रंग माध्यम याठिकाणी आपण वापरू शकतो. सर्वसाधारणपणे अपारदर्शक रंग,पारदर्शक रंग, ऑइल पेस्टल, कलर पेन्सिल इत्यादी माध्यमातून सुंदर वस्तू चित्र साकारता येतो. सर्वप्रथम चित्राला रंग देताना समोर ठेवलेल्या वस्तूंचे नीट निरीक्षण करून त्यावरील रंग, छायाभेद ,पोत यांचा अभ्यास करून रंग काम करण्यास सुरुवात करावी. रंग काम सुरू करताना वस्तूला समान मध्यम रंगांमध्ये रंगून घेऊन त्यावरील छायाभेद गडद रंग उजळ रंग अशा रंगाचा वापर करून त्यावरील छायाभेद दाखवता येतो. किंवा ऑइल पेस्टल च्या साह्याने गडद व फिकट उजळ अशा पद्धतीने शेडींग करत वस्तूचे रंगकाम करता येते. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेला अनुभव , कला शिक्षकांनी शिकविलेल्या विविध माध्यमातील नवनवीन प्रयोग यांचा वापर करून वस्तू चित्रातील सौंदर्य निर्मिती करता येते. बरेच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने रंग काम करतात. विविध माध्यमे हाताळतात.
समोर मांडलेल्या वस्तूवर पडणारा प्रकाश कोणत्या बाजूने पडतो, यात तीव्र प्रकाशाचे व गडद छायेचे भाग कोणते व कसे दिसतात.या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. वस्तूच्या आकाराप्रमाणे तो भाग अवलंबून असतो. वस्तूंच्या आकारा मुळेच त्या गोलाकार किंवा विविध आकाराच्या दिसतात. त्यातील तीव्र व मध्यम प्रकाश मध्यम व गडद छाया व त्यांची पडलेली पडछाया हे नीट समजून घेणे अपेक्षित आहे. चित्रात छाया प्रकाशाचे प्रथम ढोबळ प्रमाण रंग काम करून नंतर तीव्र प्रकाश पडछाया दाखवता येते.
या परीक्षेला जाताना आवश्यक साहित्यसामग्री सोबत असणे साधने आवश्यक आहे.
यात A-4 साइजच्या ड्रॉईग पेपरपेक्षा किंचित मोठा बोर्ड किंवा कार्डबोर्ड, पेन्सिल एचबी, 2बी, 4बी, 6बी, शार्पनर, सर्व साहित्य असलेला कंपास बॉक्स, १२ इंचाची पट्टी, वॉटर बॅग, पाण्यासाठी वाटी, रंग बनवण्यासाठी पांढरी प्लेट, गोल व चपटे मोठे ब्रश व लहान रबर,लहान सुती कापड किंवा स्पंज, वॉटर कलर्स, पारदर्शक व अपारदर्शक रंग,क्रेआँन कलर इत्यादी सामग्री सोबत असावी.
या परीक्षेत रबराचा उपयोग कमीत कमी करावा. रंग आवश्यक तेवढेच घ्यावेत. ब्रश वेळोवेळी धुवावा,पाणी वेळोवेळी बदलावे. रफ स्केच बुक सोबत ठेवावे. प्रथम लहान स्केच करुन दहा मिनिट सराव करावा. स्केच आत्मविश्वासाने करावे. चित्रे मोठी काढण्याचा प्रयत्न करावा.वा सौंदर्य निर्मिती करावे.
प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील ऑप्शनवर क्लिक करा